Saturday, August 20, 2011

संताप

एकदा एक माणूस नवी कोरी कार धूत होता. अगदी मन लावून त्याचे काम चालले होते. तिथेच असलेली त्याची चार वर्षाची मुलगी दगड घेऊन काही तरी करत होती. थोड्यावेळाने त्याने पाहिले तर ती टोकदार दगड घेऊन त्या गाडीवर काही तरी लिहीत होती. त्याचा संताप अनावर झाला. ‘केलास सत्यानाश?’ असं म्हणत संतापाच्या भरात त्याने जवळची एक काठी घेतली आणि मुलीच्या बोटांवर मारली. चार वर्षाची चिमुरडी बिचारी कळवळून रडायला लागली. काठीच्या मार एवढा जोरात होता की तिच्या नाजूक हाताची बोटे फ्रॅक्चर झाली. तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये एडमिट करावं लागलं. वडिलांनी मारलं तरी मुलगी मात्र त्यांच्यावर रागावली नव्हती. ‘बाबा, माझी बोटं पुन्हा चांगली कधी होणार’ असं ती त्यांना विचारत राहिली. तिचे वडिल काहीच बोलू शकले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून फक्त आपल्या कृत्याचा पश्चात्ताप तेवढा वहात होता. त्यांना स्वतःच्या कृतीवर संताप आला. आपण गाडीच्या प्रेमापोटी आपल्या मुलीला मारले हे त्यांना सहनच झाले नाही. त्याच भरात ते गाडीजवळ गेले आणि तिच्यामुळे हे घडले म्हणून त्या नव्या कोर्‍या गाडीवर लाथा झाडायला लागले. थोड्यावेळाने त्यांचे लक्ष गाडीवर लिहिलेल्या अक्षरांवर गेले. त्यांच्या मुलीने तिथेच काही तरी खरडलं होतं. त्यांनी जवळ जाऊन नीट पाहिलं. त्यावर त्या मुलीनं लिहिलं होतं, ‘बाबा, लव्ह यू’. त्या मुलीच्या वडिलांनी दुसर्‍या दिवशी आत्महत्या केली.
बोध :
त्यामुले संताप हा माणसाला कुठेही घेउन जातो . कुठलीही गोष्ट पूर्णपणे विचार करुनच करावी त्यातच खरी कसोटी असते .

Thursday, August 18, 2011

जर आपणास हे विचार आवडले असतील तर इतरांना पाठवून विचार करावयास प्रवृत्त करा.



SUCCESS IS FIGHT BETWEEN YOU & YOURSELF.


 
आयुष्य फार सुंदर आहे! .. एकदा लग्न झालं की, आपलं आयुष्य सुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असं वाटण्याची जागा
,
मूल झालं की
...
मोठं घर झालं की
...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते
.
दरम्यानच्या काळात
, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत . ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .

मुलांच्या वाढत्या वयात
, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.
आपला नवरा
/ बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की
...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की
...
निवृत्त झालो की
...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल
, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो.
खरं असं, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या  
वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच
. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का?
जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये , असंच बराच काळ वाटत राहतं .
पण
, मध्ये बरेच अडथळे असतात. काही आश्वासनं पाळायची असतात, कोणाला वेळ द्यायचा असतो, काही ऋण फेडायचं असतं....
आणि अगदी शेवटी कळतं
, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.
या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही
.
आनंद हाच एक महामार्ग आहे
.  
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा
.
शाळा सुटण्यासाठी
... शाळेत पुन्हा जाण्यासाठी ... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी ... कामाला सुरुवात होण्यासाठी ... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून ... शुक्रवार संध्याकाळसाठी ... रविवार सकाळसाठी... नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी...थंडीसाठी... सुखद उन्हासाठी ... महिन्याच्या पहिल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो.एकदाचा तो टप्पा पार पडला की, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते. पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा .
आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या पाहू -  
- जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू.
- गेल्या पाच वर्षांत विश्वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत?
- या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील?
- गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का?
हं
! काहितरीच काय विचारताय? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?
टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो
.
पदकं आणि चषक धूळ खात पडतात
.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो
.
आता या चार प्रश्
नांची उत्तरं द्या पाहू -
- तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
- तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील?
- आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
- तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.
क्षणभर विचार करा
.
आयुष्य अगदी छोटं आहे
.  
तुम्ही कोणत्या यादीत असाल
? काही अंदाज लागतोय ?
मी सांगतो
.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये
. पण , हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं ,त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....
आता एक गोष्ट
.
काही वर्षांपूर्वीची
. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊ स्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.
पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली
. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.
धावता धावता एकाचा तोल गेला
. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला.
त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले
.
सारे मागे फिरले
... सारे जण...
"
डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, ""आता बरं वाटतंय?''
मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले
.
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले
. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला . बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात
.
का
?
कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते
.
आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं
. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.
शक्
य तितक्या लोकांना हे सांगा. त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही. नाही का ?
 




--

Thanks & Regards...
       With Lots Of Love...